‘सिडको’च्या भूखंडांची कोटीच्या कोटी उड्डाणे

‘सिडको’च्या भूखंडांची कोटीच्या कोटी उड्डाणे

औरंगाबाद - ‘सिडको’च्या मोक्‍याच्या निवासी भूखंडांनी कोट्यवधींची उड्डाणे घेतली. किंमत कोट्यवधी रुपये असली, तरी अनेकांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यामुळे कोट्यवधींच्या या भूखंडांची सोडत पद्धतीने विक्री करण्यात आली. ३६ पैकी सात भूखंडांची किंमत ही १ कोटी रुपयांच्या पुढे, तर दोन भूखंडांची किंमत ही दोन कोटी रुपयांहून अधिक आहे. हे प्लॉट सिडको एन- १ आणि एन- ३ भागातील आहेत.

सिडको कार्यालयात तब्बल आठ वर्षांनंतर निवासी भूखंडांची बुधवारी (ता. २२) सोडत पद्धतीने विक्री करण्यात आली. ६२ भूखंडांपैकी फक्त ३६ भूखंडांसाठीच मागणी अर्ज प्राप्त झाले होते. सोडत पद्धतीने या भूखंडांची विक्री करण्यात आली. उर्वरित २६ भूखंड चांगल्या जागेत असतानाही त्यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. एन- १ ते एन- १३ या भागांमधील एकूण ६२ निवासी भूखंडांसाठी १ हजार १० अर्ज प्राप्त झाले होते. काही भूखंडांसाठी १२ ते १५ अर्ज प्राप्त झाले. काही भूखंडांसाठी केवळ एकमेव अर्ज असल्याने संबंधितांना हवा असलेला भूखंड विक्री करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

या वेळी सिडको परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, निवृत्त न्यायाधीश उमरीकर, प्रशासक प्रवीण सेवतकर, लेखाधिकारी बी. एम. गाडे, भू-मूल्यांकन अधिकारी सुवर्णा पवार, सहायक मालमत्ता अधिकारी अस्मिता विर्शिद आदींच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १२ ते दुपारी ३ यादरम्यान इच्छुकांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. काही महत्त्वाच्या, मोक्‍याच्या भूखंडांसाठी अनेक जणांनी  अर्ज केले होते. यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. जाहिरातीमध्येच भूखंडांचे दर सूचित केलेले असतात. सिडको एन-२ विभाग चिकलठाणा विमानतळास लागून असल्याने तेथील भूखंडांसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

भूखंडांच्या किमती कोट्यवधींत
सिडकोने सोडत काढलेल्या या निवासी भूखंडांत एन-१ येथील पाच भूखंडांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर एका प्लॉटची किंमत ही २ कोटी ४ लाख एवढी आहे. ३६ पैकी सात प्लॉटच्या किमती एक कोटी रुपयांच्या पुढे आहेत, तर दोन प्लॉट प्रत्येकी दोन कोटी रुपयांना विक्री झाले. एन- १ आणि एन- ३ भागातील प्लॉट हे कोट्यवधी रुपयांचे आहेत.

८५ भूखंडांसाठी लवकरच सोडत
‘सिडको’तर्फे एन-२ भागातील सर्व्हे नंबर ५९-६० मधील निवासी ८५ भूखंडांचीही लवकरच सोडत पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येणार आहेत. अर्ज आल्यावर सोडत पद्धतीनेच या भूखंडांची विक्री केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com