एक कोटी रुपये घेऊन बिल्डरने चौघांना फसविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - प्लॉट देतो म्हणून डॉक्‍टरसह चौघांची एक कोटी ७१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. यात बिल्डरविरुद्ध महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका अधिनियम व फसवणुकीच्या आरोपाखाली शनिवारी (ता. पाच) उस्मानपुरा ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

डॉ. संतोष प्रदीप पाटील हे गुरूसहानीनगर येथे राहतात. त्यांनी तक्रार दिली, की प्लॉट खरेदीसाठी नोव्हेंबर ते ऑगस्ट  २०१५ मध्ये बिल्डर सुयोग सुरेश रुणवाल, सुरेश रुणवाल व मुकुंद व्यंकटेश डफळ यांच्याकडे २५ लाख ७१ हजार रुपये जमा केले. 

पैसे मिळाल्यानंतर प्लॉट ताब्यात द्या, अशी मागणी पाटील यांनी केली; पण त्यांना प्लॉट देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. त्यांच्यासह वैभव गंगाधर भगत (रा. मुकुंदवाडी), एकनाथ राजाराम पठारे (रा. एन. दोन, सिडको), शलाका सचिन कहांडळ यांच्याकडूनही रुणवाल यांनी एकूण ७५ लाख रुपये गोळा केले. या तिघांना अद्यापही प्लॉट मिळालेले नाहीत. फसवणूक झाल्याने संतोष पाटील यांनी तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.