जिल्हा बॅंकेने जमा केल्या  ३९ कोटींच्या जुन्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत जमा झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या ३९ कोटी रुपये मूल्याच्या जुन्या चलनी नोटा मंगळवारी (ता. ११) नागपूर येथील रिझर्व्ह बॅंकेच्या शाखेत जमा केल्या. ही रक्‍कम पोलिस बंदोबस्तात नागपूरला नेण्यात आली. दरम्यान, नोटाबंदीच्या काळातील तीन दिवसांत खातेदारांनी बॅंकेत जमा केलेली ही रक्‍कम होती. खातेदारांनी जुन्या नोटा बदलून ही रक्‍कम बॅंकेच्या नावावर जमा केली होती.

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला चलनातील हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खातेदारांनी सुरवातीच्या तीन दिवसांत जुन्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा केल्या होत्या. मात्र, आरबीआयने जिल्हा बॅंकेकडील ही रक्‍कम घेण्यास त्यावेळी नकार दिला होता. यामुळे आतापर्यंत ३९ कोटींची ही रक्‍कम पडून होती. मंगळवारी अखेर ही रक्‍कम आरबीआयने जमा करून घेतली. 

औरंगाबादेतून मोठ्या बंदोबस्तात ही रक्‍कम नागपूरच्या आरबीआय शाखेत जमा करण्यात आली. यामध्ये सहा हजारांहून अधिक नोटा फाटक्‍या आणि खराब निघाल्या. ही रक्‍कम बॅंकेच्या खात्यावर जमा झाली आहे.

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM