अंमलबजावणीस वेळ; मात्र पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेळ लागत आहे, हे खरे आहे; मात्र पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळेल, असा दावा अन्न व औषधी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केला.

श्री. बापट यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयात विभागातील अनेक तक्रारींबाबत सुनावणी झाली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

या वेळी श्री. बापट यांनी सांगितले, की कर्जमाफीच्या विषयावर शेतकऱ्यांनी संयम बाळगावा. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीदरम्यान अधिक गोंधळ झाला. तसा प्रकार आता होणार नाही. पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणारच आहे. 

सरकारविरोधात सध्या नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याच्या मुद्यावर ते म्हणाले, की तो फक्त प्रचाराचा भाग आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारने सकारात्मक गोष्टी केल्या आहेत. थोडे संयमाने घेतले तर त्याचे परिणामही पाहायला मिळतील.

अन्नसुरक्षा योजना बंद करण्याची तयारी 
दुष्काळग्रस्त तेरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेली अन्नसुरक्षा योजना बंद करण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच या योजनेचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने योजना बंद करण्याचे संकेत दिले आहेत. याचा मराठवाड्यातील ३६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.  मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्नसुरक्षा योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील ३६ लाख सहा हजार २६५ शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत वाटप केले जातात. दरम्यान, श्री. बापट यांना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या अन्नसुरक्षा योजनेसंदर्भात सरकारची भूमिका काय, या प्रश्‍नावर ‘या योजनेचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने ती बंद केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: aurangabad news farmer girish bapat