कर्जमाफीनंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद - विरोधी पक्षांची मागणी, शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या उद्रेकानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी (ता. ६) भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी उपस्थित होते. 

केशव मदन (जालना) यांनी शेतमालाला चांगला भाव मिळाल्याचा दावा केला. कर्जमाफीच्या निर्णयाने तरुण शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल अशी भावना कैलास निकम (औरंगाबाद) यांनी व्यक्त केली. एकनाथ जगताप (हिंगोली), दत्ता जाधव (बीड), आत्माराम पाटील (नांदेड), मारुती घोणसे (लातूर) यांची उपस्थिती होती. जिंतूर तालुक्‍यातील अश्रुबा सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसारखा पटका बांधला. 

मुख्यमंत्र्यांना दिली बैलगाडी
शेतकऱ्यांनी मुख्यंत्र्यांच्या भेटीदरम्यान बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. ‘मुख्यमंत्री महोदय आपण पारदर्शी आहात, त्यामुळेच कर्जमाफीचा लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांची आकडेवारी देऊ शकलात. असेच आमच्या पाठीशी राहाल,’ अशा आशयाचे भावनिक पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले. या वेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रशांत बंब, नारायण कुचे, तानाजी मुटकुळे, शिरीष बोराळकर, ज्ञानोबा मुंडे, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते.