शहरात कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

औरंगाबाद - कचरा जाळणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी कारवाई करण्याचा महापालिकेने इशारा दिला होता. यानंतरही शहरात आगी लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. १३) सकाळपासून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सहा ठिकाणी जाऊन कचऱ्याला लावलेल्या आगी आटोक्‍यात आणल्या. 

शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, तीन आठवड्यानंतरही महापालिकेला कचऱ्याची कोंडी फोडण्यात अपयश आल्याने या ढिगांतून प्रचंड दुर्गंधी निघत आहे. त्यामुळे जमा झालेला कचरा पेटवून देण्याचे प्रकार सुरूच आहेत. या आगीमुळे प्रदूषणही धोकादायकरीत्या वाढले आहे. त्यामुळे कचऱ्याला आगी न लावण्याचे आवाहन करीत महापालिकेने थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही मंगळवारी सहा ठिकाणी आगी लावण्यात आल्या. त्यात अभिनय टॉकीज, काल्डा कॉर्नर, चुन्नीलाल पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन रोड, पदमपुरा या भागांचा समावेश आहे. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणली.

Web Title: aurangabad news fire garbage amc

टॅग्स