खासदार राजू शेट्टी यांचा स्वतंत्र मराठवाड्याला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - ‘‘छोटी-छोटी राज्ये विकासाकडे झेप घेऊ शकतात, हे अनेकदा पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा राहील’’, असे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता. सहा) म्हटले. कार्यक्रमाला प्रत्यक्ष येऊ न शकल्याने त्यांनी उपस्थितांशी मोबाईलद्वारे संवाद साधला.

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मौलाना आझाद संशोधन केंद्रात मेळावा घेण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार शेट्टी यांनी या वेळी उपस्थितांशी मोबाईलद्वारे संवाद साधला. अध्यक्षस्थानी जे. के. जाधव यांची उपस्थिती होती. मराठवाडा विकास आंदोलनात सक्रिय राहिलेले द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भगवानराव कापसे उपस्थित होते. प्रा. बाबा उगले यांनी प्रास्ताविक केले. ॲड. देशमुख यांनी हक्काच्या पाण्यासाठी केलेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली. या वेळी श्री. पाथ्रीकर, श्री. जाधव, श्री. सत्तार यांचीही भाषणे झाली. प्राचार्य राजेश कदम, ॲड. येवते पाटील, गंगाधर ढवळे, मधुकर पाटील इंगळे, ॲड. गणेश करंडे, विशाल दंडगे, अभिजित गायकवाड यांनी पुढाकार घेतला.