विद्यापीठात आजपासून केंद्रीय युवक महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रविवारी (ता. 29) केंद्रीय युवक महोत्सवाला सुरवात होत आहे.

महोत्सवासाठी विद्यापीठ परिसरात सात रंगमंच तयार केले असून 35 कलाप्रकारांचे चार दिवस सादरीकरण होणार आहे. महोत्सवात 176 महाविद्यालयांनी संघाची नोंदणी केली आहे. यात एक हजार 70 विद्यार्थी, 846 मुली, पुरुष संघप्रमुख 157, महिला संघप्रमुख 106 आहेत. यासाठी 57 परीक्षकांची नियुक्‍ती केली आहे. 

नृत्य विभागातील सृजनरंग रंगमंचावर लोकआदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्‍चात्य, सुगम गायन पाश्‍चात्य, लावणी, लोकवाद्यवृंद या प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. खो-खो मैदानावरील लोकरंग रंगमंचावर पोवाडा, भारुड, वासुदेव, भजन, गोंधळ होईल. विद्यापीठ नाट्यगृहात नाट्यरंग रंगमंचावर मिमिक्री, प्रहसन, मूक अभिनय, एकांकिकांचे सादरीकरण होईल. ऍकॅडमिक स्टाप कॉलेज गेस्टहाऊस समोर नटरंग रंगमंचावर लोकनाट्य, लोकगीतांचे सादरीकरण होणार आहे. कमवा शिका योजना येथे ललितरंग रंगमंच येथे रांगोळी, मातीकाम व मृद्‌मूर्तीकला, पोस्टर, व्यंगचित्रकला, कातरकाम, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी व चित्रकला हे प्रकार होतील. प्राणिशास्त्र विभागात शब्दरंग रंगमंचावर वक्‍तृत्व, वादविवाद, काव्यवाचन, प्रश्‍नमंजूषा होईल. सीएफसी हॉलमध्ये नादरंग रंगमंचावर शास्त्रीय सूरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, सुगम गायन भारतीय, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन होणार आहे.