ढोलकीच्या तालावर थिरकली तरुणाई

ढोलकीच्या तालावर थिरकली तरुणाई

औरंगाबाद - विद्यापीठातील युवक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) बहारदार लावण्या सादर झाल्या. एकाहून एक वरचढ लावण्यांवर प्रेक्षक थिरकले.

नटणं, मुरडणं आदी विविध कलागुणांचा मिलाफ लावणीतून एकत्रितरीत्या सादर करणे म्हणजे कसरतच; परंतु सादर झालेल्या लावण्या पाहून महाराष्ट्राची लोककला जोपासण्याचे कार्य आजची तरुण पिढी जोमाने पुढे नेतेय. या वेळी सादर करण्यात आलेल्या लावण्यांपैकी ‘मला जाऊ द्या ना घरी आता वाजले  की बारा’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘पाव्हणं रोखून बघू नका, ढोलकीच्या तालावर, पोटासाठी नाचते मी...’ आदी लावण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. 

शिट्या, टाळ्या,  फेटे उडवत जल्लोष
एकाहून एक सरस लावण्या सादर होत असताना विद्यार्थी प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवत प्रतिसाद देत होते. यामुळे कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलेच प्रोत्साहन मिळत होते. विद्यापीठाच्या संघाने  सादर केलेल्या ‘बाई माझा ऐवज चोरून नेला’ या लावणीवर प्रेक्षकांनी फेटे उडवत वन्स मोअरसाठी पिच्छा धरला होता. 

पोलिस उरले नावापुरते 
विद्यापीठात लावण्या म्हटलं की गर्दी आणि गर्दी म्हटली की चांगल्या कार्यक्रमाचा इस्कूट हे वर्षांनुवर्षाचे सूत्र विद्यापीठाने यंदाही लक्षात घेऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. या रंगमंचावर विविध महाविद्यालयांतील सातशे विद्यार्थी संख्या असणाऱ्या ठिकाणी केवळ दोनच पोलिस देण्यात आले होते. दरम्यान, झालेला गोंधळ आवरता आवरता पोलसांच्या नाकीनऊ आले होते. 

नृत्य करण्यासाठी मुलांनाच परवानगी का?
लावण्या सादर होत असताना मुले लावण्यांवर थिरकत होती. दरम्यान, काही मुलींनी सुरवात करताच उपस्थित मुलांचे लक्ष तिकडेच गेल्याने कार्यक्रमाची मज्जा गेल्याचे कारण देत तिला नृत्य करण्यास मज्जाव करण्यात आला. इतकेच नाही तर एका स्वयंसेवकाने ‘एजबार झाल्यानंतर नाचणे इष्ट नाही, नाचायचेच असेल तर वरातीत का नाचत नाही’ असे उपहासात्मक टोमणे मारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर मुलींनी एकजूट दाखवत नृत्य करण्यासाठी मुले-मुली असा भेद का करता असा सवाल केला. नृत्य करणाऱ्या मुलीचे शिक्षक आणि मज्जाव करणारे असे दोन गट निर्माण झाले होते. अखेर थांबविण्यात आलेला लावण्यांचा डाव पोलिस, सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सावरत पुन्हा सुरू करण्यात आला खरा; मात्र नृत्य करण्यावरून उपहासात्मक टोमणा मारणाऱ्या प्राध्यापक स्वयंसेवकाला हे शोभते का? असा सवाल स्त्री वर्गातून करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com