लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर तीन वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीस सोमवारी (ता. 25) पोलिसांनी अटक केली. संदीप विश्‍वनाश सानप (रा. खाळेगाव, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे त्याचे नाव असून, त्याने परिचारिकेचा तीनवेळा गर्भपातही करून घेतल्याचा आरोप आहे. 

परिचारिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती जालन्यातील एका रुग्णालयात काम करीत होती. दरम्यान, संदीप हा औषधी दुकान चालवत होता. संदीपने लग्नाचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. दरम्यान, पीडिता तीनदा गर्भवती राहिली असता तिला संदीपने गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. परिचारिकेने संदीपवर लग्न करण्याचा दबाव आणल्यानंतर त्याने जालन्याच्या माळाच्या गणपती मंदिरात पीडितेला हार घालून लग्न केले व दोघे औरंगाबाद शहरामध्ये एकत्र राहू लागले; मात्र पीडिता चौथ्या वेळेस गर्भवती राहिली. त्यावेळी संदीपने दुसरे लग्न केल्याचे समजले. पीडितेच्या नातेवाईकांनी त्याला जाब विचारला असता, पीडितेला गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात करण्याचा सल्ला संदीपने दिला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात संदीपविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्याला गुरुवापरपर्यंत (ता. 28) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

Web Title: aurangabad news nurse rape case