सहापदरी पैठण रस्त्यावर पादचाऱ्यांची सोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - महानुभाव आश्रम ते लिंक रोडदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात पादचाऱ्यांचीही सोय करण्यात येणार आहे. वृक्षतोडीमुळे चर्चेत आलेल्या या रस्त्यालगत या वॉक वेलगत नव्याने झाडे लावण्यात येणार आहेत. 

महानुभाव आश्रम ते लिंक रोडदरम्यानच्या व्हाईट टॉपिंगच्या कामाला गेल्या महिन्यात सुरवात करण्यात आली. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार असली तरी हा रस्ता आता सहा पदरी होणार आहे. तीस कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या या रस्त्याचे दोन पदर काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. त्याशिवाय सर्व्हिस रोडसारखाच एक पदरी कॅरेज वे डांबरी करण्यात येणार आहे. 

 या रस्त्याच्या कामासाठी एकूण तीस मीटर रुंद जागा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी २२.५० मीटरची जागा ही वाहनांच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणार आहे.

रस्त्याची एक बाजू ही ११.२५ मीटरची राहणार असून, त्यातील ७.५० मीटर रुंद रस्ता (कॅरेज वे) हा युरोपियन पद्धतीच्या यंत्रणेच्या साहाय्याने बनविण्यात येत आहे. 

वॉक वेची रुंदी तीन मीटर
महानुभाव आश्रम ते लिंक रोडदरम्यान जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय येथे शाळा, नागरी वसाहती असल्याने रहिवाशांसाठी तीन मीटर रुंदीचा वॉक वेही देण्यात येणार आहे. वडाची जुनी झाडे तोडल्याने चर्चेत आलेल्या या रस्त्यालगत होणाऱ्या वॉक वेला जोडून झाडेही लावण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाची रुंदीही १.२ मीटर राहणार आहे. 

तीस कोटींचे काम दोन टप्प्यांत
या रस्त्यावरील गाड्यांची संख्या आणि त्यांची होणारी कोंडी लक्षात घेता, या रस्त्याच्या कामासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडून ना हरकत घेत हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. तीस कोटींचा खर्च असलेल्या या कामातील व्हाईट टॉपिंगचा खर्च २२.५० काटी तर डांबरी रस्त्याचा कामाचा खर्च ७.५० कोटी राहणार आहे.