गुढी पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत बाटलीबंद पाणी बंद करण्यात येईल. तसेच पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावाच लागेल

औरंगाबाद - निसर्गाचा समतोल राखण्यासाठी येत्या पाच महिन्यांत म्हणजे गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी करण्यात येणार आहे.  यासाठी जाणकारांची मते जाणून घेतली जात असून लवकरच कडक कायदा तयार केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे दिली.

औरंगाबाद येथे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्लॅस्टिक बंदी बाबत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कदम म्हणाले, मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत बाटलीबंद पाणी बंद करण्यात येईल. तसेच पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावाच लागेल.
हा देशहिताचा निर्णय असून कुणाचीही मुजोरी खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: aurangabad news: plastic ramdas kadam