रेल्वेस्थानकात विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई 

रेल्वेस्थानकात विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई 

औरंगाबाद - रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी रविवारी (ता. १९) रेल्वेस्थानकावर विविध स्टॉलची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी स्वत: प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यात खाद्यपदार्थांचे फलक दर्शनी भागात लावले नसल्याने तीन स्टॉलधारकांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर दरफलक न लावणाऱ्या स्टॉलधारकांची कानउघाडणी केली. 

डॉ. सिन्हा यांनी रेल्वेतून उतरताच सरळ रेल्वेस्थानकावरील फुड प्लाझा, कॅन्टीन, पाणी स्टॉल, स्टेशनरीसह परवानाधारक विक्रेत्यांच्या स्टॉलची तपासणी केली. फुड प्लाझावर तीनच खाद्यपदार्थ असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रवाशांनी जेवण मागितले तर काय देणार असा सवाल करून प्लाझाला पाचशे रुपयांचा दंड केला. दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलधारकाला दर्शनी भागात दरफलक नसल्याने पाचशे रुपये दंड ठोठावला. अन्य एका स्टॉलवरही दंडात्मक कारवाई केली.

एका स्टॉलवर त्यांनी खाद्यपदार्थाची चवही चाखली. अवघ्या पंधरा रुपयांत चांगल्या दर्जाचा नाश्‍ता मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून स्टॉलचालकाला प्रोत्साहन दिले. त्यानंतर डॉ. सिन्हा यांनी जुन्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना काही सूचनाही त्यांनी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com