‘व्हीआयपी’ रस्त्यासाठी दहा कोटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

औरंगाबाद - हर्सूल टी-पॉइंट ते बाबा पेट्रोलपंपादरम्यानच्या ‘व्हीआयपी’ रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. दरम्यान, हा रस्ता शहरातून जात असल्याचे कारण देत ‘एनएचएआय’ने त्याच्या दुरुस्तीस नकार दिला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने सात कि.मी.साठी १०.०५ कोटींचा निधी मंजूर केला असून, मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याची तयारी केली आहे. 

हा रस्ता जळगाव ते दिघी बंदर असा असलेल्या ‘एनएच ७६६ सी’चा भाग आहे. दरम्यान, औरंगाबादेतील हर्सूल टी-पॉइंट ते बाबा पेट्रोलपंपादरम्यानचा रस्ता शहरातील असल्याचे सांगत ‘एनएचएआय’ने भारतमाला प्रकल्पातून त्याला वगळले होते. यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. शिवाय या रस्त्याचे सर्वेक्षण करून यावर पडलेल्या ९३९ खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासालाही ‘सकाळ’ने वाचा फोडली होती. त्याची दखल घेत या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नूतनीकरणासाठी १०.०५ कोटींची निविदा काढत हा रस्ता महामार्गाचा भाग असल्याचे सिद्ध केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निगराणीत हे काम होणार असून, रस्त्याची लेव्हलिंग आणि त्यावर डांबरी थर चढविण्यात येणार आहे. त्याची डिफेक्‍ट लायबेलिटी दोन वर्षे राहणार आहे. 

बाबा पेट्रोलपंप ते महानुभाव आश्रम रस्त्याचा प्रस्ताव 
बाबा पेट्रोलपंपापर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या निविदा निघाली आहे; पण बाबा पेट्रोलपंप ते महानुभाव आश्रम रस्त्याची दुरवस्था पाहता त्याची दुरुस्ती होणे गरजेचे झाले आहे. अवजड वाहतूक वाहणाऱ्या या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी दिल्लीला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा रस्ता चारपदरी आणि तीन किलोमीटरचा असून, यात दोन उड्डाणपुलांचा समावेश आहे.

Web Title: aurangabad news road encroachment