सत्यपालसिंहांचे वक्‍तव्य पूर्वनियोजित - जयदेव डोळे

सत्यपालसिंहांचे वक्‍तव्य पूर्वनियोजित - जयदेव डोळे

औरंगाबाद - डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत खोटा ठरवून विज्ञानाची पुरेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरवर अतार्किक व असंबंध वाटणारे वक्‍तव्य पूर्वनियोजित व्यूहरचनात्मकरीत्या सर्वसामान्य जनतेवर थोपवले जात असल्याची टीका राजकीय अभ्यासक प्रा. जयदेव डोळे यांनी केली. 

स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या तीन दिवसीय राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलनाचा रविवारी (ता. 20) समारोप झाला. 

संमेलनाच्या शेवटच्या दिवशी विशेष सत्रात प्रा. डोळे बोलत होते. यावेळी एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, राज्याध्यक्ष मोहन जाधव, उपाध्यक्ष सुनील राठोड, सरचिटणीस बालाजी कलेटवाड उपस्थित होते. प्रा डोळे म्हणाले, ""केंद्रातील आरएसएस पुरस्कृत भाजप सरकार शिक्षण क्षेत्रांत व अभ्यासक्रमात बदल करण्याचा डाव आखत आहे, हे आपल्यापुढील आव्हान आहे. म्हणून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी उच्चशिक्षित तरुण आणि विशेषतः विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.'' 

श्री. सानू म्हणाले, ""देशातील शैक्षणिक परिसरावर होत असलेले हल्ले विद्यार्थी चळवळीने एकजुटीने परतवून लावले पाहिजे. विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या निर्णयांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणावर होतो. म्हणून विद्यापीठाच्या निवडणुका विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन निवडणुका या लोकशाही पद्धतीने व्हायला पाहिजे, त्यासाठी लढणे आवश्‍यक आहे.'' 

जिल्हा सचिव अभिमान भोसले, नितीन वाव्हळे, सत्यजित मस्के, रमेश जोशी, लोकेश कांबळे, प्राजक्ता शेटे, बाबाराय भोसले, स्टालीन आडे, मनीषा मगरे, भगवान रोटे, अशोक भोसले, रेखा काकडे, प्रदीप सुरवसे, प्रफुल्ल गवई, किशोरी वैद्य, राजेश्वर खुडे, पल्लवी बोरडकर, रवी मोताळे, सुरेखा जोगदंड, संतोष मांजरणे यांनी पुढाकार घेतला. 

एसएफआयची 17 जणांची उपसमिती 
संमेलनाच्या समारोपीय सत्रात 17 सदस्यांची एसएफआयची नवीन राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी उपसमिती निवडण्यात आली आहे. या कमिटीचे राज्य निमंत्रक म्हणून सुनील राठोड, सहनिमंत्रक म्हणून आर्यविकास वाठोरे, निविता इदे यांची तर सदस्य सोमनाथ निर्मळ, नितीन वाव्हळे, लोकेश कांबळे, मनीषा मगरे, भागवत पवार, संदीप मरभळ, नवनाथ मोरे, सचिन साबळे, गौरव आणि संदीप यांची निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com