दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल ४.९२ टक्क्यांनी घसरला

सुषेन जाधव
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

  • औरंगाबाद विभागाचा निकाल केवळ २७.०७ टक्के
  • हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक (३३.०८) निकाल
  • राज्याचा निकाल २४.४४ टक्के

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै/ऑगष्ट मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेचा औरंगाबाद मंडळाचा निकाल मंगळवारी (ता. २९) दुपारी जाहीर झाला. यंदाचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत ४.९२ टक्क्यांनी घसरला आहे.

विभागातील पाच जिल्ह्यातील १३ हजार २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १३हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून केवळ ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तब्बल ९ हजार ६०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विभागाचा निकाल केवळ २७.०७ टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६.१७ ने अधिक असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

नुसतीच निकालाची घाई : गुणपत्रिकाच नाही
बोर्डातर्फे निकाल जाहीर करण्यात आला खरा मात्र गुणपत्रिका वाटप करण्याची स्वतंत्र तारीख कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ऑगष्टअखेरीस प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा नियम असतानाही गुणपत्रिका मिळणे निश्चित नसल्याने विद्यार्थी, पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झाला निकाल जाहीर
मंडळाचे प्रभारी अध्यक्ष वैजनाथ खांडके यांच्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तेंव्हापासून अर्थात ९ ऑगष्ट पासून शिक्षक उपसंचालक कार्यालय आणि बोर्ड या दोन्ही कार्यालयात नाहीत त्यामुळे मंगळवारी त्यांच्या अनुपस्थित निकाल जाहीर करण्यात आला.

जिल्हानिहाय निकाल खालीलप्रमाणे (टक्के)
औरंगाबाद - २७.८३
बीड - २९.१३
परभणी - १८.१०
जालना - ३०.१९
हिंगोली - ३३.०८
विभागाचा एकूण निकाल - २७.०७ टक्के