अल्पवयीन खेळाडूवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू आहे. पीडित मुलीस वेळोवेळी धमकी देऊन अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली. मंगेश गवळी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून वसूल करण्यात आलेल्या दंडापैकी 15 हजार रुपये पीडित अल्पवयीन मुलीस देण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

हनुमाननगर भागातील अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. महिला पोलिस उपनिरीक्षक एम. बी. लाड यांनी कसून चौकशी केली असता त्या मुलीने मंगेश नानाभाऊ गवळी (हनुमाननगर) याने वेळोवेळी धमकी देऊन अत्याचार केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या खटल्याची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांच्यासमोर झाली. सहायक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने मंगेश यास सात वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास, दुसऱ्या कलमान्वये दहा वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

तपासादरम्यान केला गर्भपात 
या गुन्ह्याचा तपास करताना पीडित अल्पवयीन मुलगी 18 आठवड्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिचा घाटी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. गर्भपात केल्यावर त्या अर्भकाचा डीएनए करण्यासाठी नमुने घेण्यात आले. पीडित अल्पवयीन मुलगी, मंगेश आणि अर्भकाच्या डीएनएची तपासणी कलिना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत केली असता त्यामध्ये अर्भक हे मंगेशचे असल्याचा अहवाल प्राप्त झाला. 

Web Title: aurangabad news Ten years of persistence