औरंगाबादेत महिलेच्या छेडछाडीवरून तीन गाड्या फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

काही दिवसांपासून एका महिलेला एक व्यक्ती छेडत होता. तिने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. 22) या प्रकरणात बाळू आश्रूबा पैठणे(२८) व सतीश पैठणे या दोघाच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र त्यांना अटक झाली नव्हती. 

औरंगाबाद : औरंगाबादेतील सिडको एन -7, मथुरानगर येथे महिलेच्या छेडछाडीतून तीन गाड्या फोडल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर रविवारी (ता, 24) सकाळी 11.30 वाजता महिलांचा जमाव सिडको ठाण्यात दुसऱ्यांदा तक्रार देण्यासाठी पोचला.  

काही दिवसांपासून एका महिलेला एक व्यक्ती छेडत होता. तिने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. 22) या प्रकरणात बाळू आश्रूबा पैठणे(२८) व सतीश पैठणे या दोघाच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र त्यांना अटक झाली नव्हती. 

सिडको पोलीसांनी गुन्हा नोंदवला पण संशयितांना अटक केली नाही. ठोस कारवाई  न झाल्याने संशियत आरोपींचे मनोबल  वाढले. यातून महिला व तिच्या कुटुंबाला  शनिवारी (ता. 23) संशयितांनी  मारहाण केली तसेच छेडछाड सुरूच होती. संशियत आरोपी व त्याच्या भावाकडून मथुरानगरमध्ये सतत सुरु असलेल्या त्रास यामुळे मथुरानगर येथे तीन गाड्याना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान येथील महिलांचा मोठा जमाव थेट सिडको पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर गुन्हा दाखल होऊनही संशयिताला अटक का केली नाही असा जाब त्यांनी पोलिसांना विचारला. त्यानंतर पोलिसानी सूत्रे हलवून संशयितांना ताब्यात घेतले.  असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Aurangabad news women harassment in Aurangabad