शिक्षणमंत्र्यांएवढं अवघड काम दुसरं कोणतचं नसतं, पवारांनी सांगितला किस्सा

''माझ्या दृष्टीने शंकरराव चव्हाणांनी माझी सुटका केलेली आहे.''
Sharad Pawar
Sharad PawarSakal

आज औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आयोजित केलेल्या पुस्तक वितरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी त्यांनी शिक्षकमंत्री असतानाचा भन्नाट किस्सा सांगितलाय. शिक्षकमंत्रीपदा इतकं अवघड काम दुसरं कुठलचं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

वसंतर नाईक मुख्यमंत्री असताना शरद पवार त्यांच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री होते. तसंच शिक्षणमंत्री असल्यामुळे अनेक शिक्षक संघटनाशी त्यांचा संबंध येत. या संघटना आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडत, पण या सगळ्या मागण्यावर मंत्री विचार करत, आणि हा निर्णय जर घेतला तर राज्यात एकूण शिक्षक किती? शिक्षण क्षेत्रातील सहभागी किती?आणि आर्थिक ओझ किती पडेल? आणि एवढं ओझं माझ्या खात्याला बजेटमध्ये शक्य नाही, हे जेव्हा मंत्री म्हणून ध्यानात येत. तेव्हा मात्र ते संघटनांना हो की नाही सांगू शकत नाहीत. पण जेव्हा मंत्री हो की नाही सांगत नाही, तेव्हा भेटायला आलेल्या शिक्षकसंघटनेतील मंडळींना हा मंत्री म्हणजे आपल्या वर्गातला कच्चा विद्यार्थी आहे, असं वाटतं. ते पुन्हा पुन्हा समजून सांगायचं प्रयत्न करतात.''

Sharad Pawar
FIR वर सही नव्हती, खार पोलिसांनीदेखील केलं मान्य : सोमय्या

एकंदरितचं शिक्षकमंत्र्यांची कशी गोची होते, याचा हा किस्सा सांगताना पवार पुढे सांगतात, ''या दरम्यान जेव्हा मंत्रीमंडळ बदललं. वसंतराव नाईकांनंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही जर मला घेणार असाल तर मला शिक्षण खात्यातून काढा. मला शेती खातं असं काहीतरी द्या. त्यांनी शेती खातं दिलं. माझ्या दृष्टीने शंकरराव चव्हाणांनी माझी सुटका केलेली आहे.'' शरद पवारांनी हा किस्सा सांगितला नंतर एकच हशा पिकला.

आजच्या कार्यक्रमात देखील शिक्षकसंघटनेकडून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तेव्हा आज अर्थमंत्र्यांना नक्कीच झोप लागणार नाही असं सांगत त्यांनी आजित पवारांची फिरकी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com