वसमतच्या मोंढ्यात हळद ११ हजार १११ रुपये प्रतिक्विंटल

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ५०० पोत्याची आवक
Turmeric
Turmericesakal

वसमत : येथील बाजार पेठ हळदीच्या खरेदी-विक्री साठी राज्यात दोन नंबरची आहे. मोंढ्यात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी ता. दोन हळदीला ११ हजार १११ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शेतकरयांच्या आर्थिक अडचणी दूर करुन पिवळ करणारी शेतीमाल म्हणजे हळदीचे उत्पादन होय. वसमत तालुका व परिसर हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने येथील हळदीला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असते. तसेच हळदीच्या उत्पन्नावर अनेक शेतकर्यांचे आर्थिक गणिते अवलंबून असतात.

वसमतच्या मोंढ्यात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या ५०० पोत्याची आवक झाली. लिलावात (बिटात) जास्तीत जास्त ११ हजार १११ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तालुक्यातील पार्डी येथील रमेश जगदेवराव बागल यांच्या हळदीला सर्वाधिक भाव मिळालेले शेतकरी होत. हळद विक्रीसाठी शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आणावी असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तान्हाजी पाटील बेंडे, प्रशासकीय संचालक मंडळ, सचिव यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com