सफारी पार्कमध्ये लावणार महापालिका तीस हजार झाडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - मिटमिटा भागात शंभर एकर जागेत विकसित करण्यात येणाऱ्या सफारी पार्कमध्ये महापालिकेतर्फे तीस हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी (ता. चार) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

महापालिकेतर्फे मिटमिटा भागात शंभर एकरावर सफारी पार्क विकसित करण्यात येणार आहे. सिद्धार्थ उद्यानातील जागा प्राण्यांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे शासनाने महापालिकेला नुकतीच शंभर एकर जमीन दिली आहे. या जागेवर यंदाच्या पावसाळ्यात सुमारे तीस हजार झाडे लावण्यात येणार आहेत. या संदर्भात महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, की सफारी पार्क होण्यापूर्वी संपूर्ण जागेपैकी ३० टक्‍क्‍यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मंगळवारी होईल. वृक्षलागवडीची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे दोन हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. विविध जातींची रोपेही उपलब्ध आहेत. 

या संदर्भात कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी शनिवारी (ता. एक) पाहणी केली.