बॅंकेचे 15 लाख लुटणारे दोघे गेवराईमध्ये जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

गेवराई - स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या गेवराई शाखेचे पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या संशयितांना पोलिसांनी पाच तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून रक्कम व मोटारसायकल जप्त केली आहे.

गेवराई - स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या गेवराई शाखेचे पंधरा लाख रुपये लुटणाऱ्या संशयितांना पोलिसांनी पाच तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून रक्कम व मोटारसायकल जप्त केली आहे.

बॅंकेच्या गेवराई शाखेतून याच बॅंकेच्या धोंडराई (ता. गेवराई) शाखेसाठी पंधरा लाख रुपये गुरुवारी वाहनातून नेले जात होते. दुपारी बाराच्या सुमारास धोंडराई फाट्याजवळ विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी चालकाच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकून वाहन थांबविले. वाहनातील शिपायावर तीक्ष्ण हत्याराने वार करून रक्कम घेऊन गेवराई रस्त्याने पोबारा केला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. तपासात संशयित गेवराई - शेवगाव रस्त्यावरील गोपाळ वस्तीवरून बागपिंपळगाव शिवारात गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बागपिंपळगाव शिवारातील नाल्यात दोघे दबा धरून बसल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी जेरबंद केले. ऋषिकेश श्रीहरी महानोर (वय 20), शंकर दामोदर शेंडगे (वय 22, दोघे रा. बागपिंपळगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

मराठवाडा

औरंगाबाद - गावातून शहरात आलेला प्रत्येकजण कुठेतरी दुरावलेपण अनुभवत असतो. कितीतरी दुःख अनुभवत असतो. आपली सुख-दुःखे हस्तांतरित केली...

01.39 PM

युवा शेतकरी बुद्धभूषण साळवे यांचा प्रयोग माजलगाव - दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजलपातळी...

01.39 PM

औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना...

01.30 PM