लग्नाच्या अडीच लाखांसाठी बॅंकांकडून विघ्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

लातूर - पाचशे व हजार रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर लग्नासाठी बॅंकेतून पैसे काढण्याची अट केंद्र सरकारने शिथिल केली व अडीच लाख रुपये काढण्याला परवानगी दिली. आठ दिवसांपूर्वी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मार्गदर्शक तत्त्वे बॅंकांकडे बुधवारी (ता. 23) दाखल झाली आहेत. त्यानुसार हे पैसे काढण्यासाठी लग्नपत्रिकेसह पॅनकार्ड व लग्नासाठी विविध ठिकाणी बुकिंग केलेल्या पावत्याही द्याव्या लागणार आहेत. यामुळे अडीच लाख पदरात पाडून घेण्यासाठी वधू-वर पित्याला मोठी कसरत करावी लागणार असून, हुंड्याची गोची झाली आहे.

चलनातील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आठ नोव्हेंबर रोजी बाद केल्यानंतर सरकारने बॅंकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा घातल्या आहेत. यामुळे विविध व्यवहार ठप्प होण्यासोबत लग्नसमारंभाच्या खर्चासाठी अडचण झाली. अडचण लक्षात घेऊन सरकारने आठ दिवसांपूर्वी बॅंकेतून अडीच लाख रुपये काढण्यासाठी परवानगी दिली; मात्र त्यासाठीचे मार्गदर्शक तत्त्वे (गाईड लाईन्स) जारी केले नव्हते. यातूनच बॅंकांकडून मनमानी नियमांचा पाढा वाचला जात होता. मुलीच्या लग्नासाठी पैसे काढणाऱ्यांना वरांच्या पॅनकार्डची मागणी करण्यात आली. मार्गदर्शक तत्त्वानुसार वधू, वर व त्यांच्या आई-वडिलांना स्वतःच्या बॅंक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. त्यासाठी त्यांना स्वतःचे पॅनकार्ड द्यावे लागणार असून लग्नपत्रिकेसह लग्नासाठी केलेल्या खर्चाच्या नियोजनाच्या पावत्या द्याव्या लागणार आहेत. यात बॅंकेत खाते नसलेल्यांनाच दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम देता येणार आहे. मंगल कार्यालय बुकिंग केल्यासोबत अन्य पुरावे द्यावे लागणार आहेत. बॅंडवाला, मंडपवाला व अन्य कोणालाही रोखीने पैसे द्यायचे असतील तर त्यांच्यांकडून त्यांचे कोणत्याही बॅंकेत खाते नसल्याचे लिहून घेऊन बॅंकेत द्यावे लागणार आहे. यातून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम धनादेशानेच द्यावी, असे अप्रत्यक्ष बंधन सरकारने वधू-वरांसह त्यांच्या पालकांवर घातले आहे. या स्थितीत वधू व वरांच्या पालकांची गोची झाली असून, लग्नात ठरलेला हुंडा कसा घ्यायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. चेकने रक्कम घेतल्यास पुढे चालून हुंडाबंदी कायद्यानुसार कारवाईची शक्‍यता आहे.

Web Title: bank's difficulty wedding