बीड जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू

बीड जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू

बीड - जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ या काळात मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापन झालेल्या १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारपासून (ता. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. ता. २६ डिसेंबरला या ग्रामपंचायतींच्या १६२ सरपंचपदांसाठी, तसेच ग्रामपंचायतींतील एकूण १४३८ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर आहे. ता. १२ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून ता. १४ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर प्रचाराला सुरवात होईल.  

या ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २७ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल घोषित केले जाणार आहेत.

निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण ५३० प्रभाग आहेत. याशिवाय सदस्यांच्या प्रवर्गामध्ये अनुसूचित जातीसाठी १९४ जागा, अनुसूचित जमातीसाठी ८ जागा, मागास प्रवर्गासाठी ३६७ जागा राखीव आहेत, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८६८ जागा आहेत. उमदेवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.

निवडणूक रणधुमाळीने वातावरण तापले
सध्या जिल्ह्यात थंडीचे वातावरण असले तरी निवडणूक लागलेल्या १६२ ग्रामपंचायतींमध्ये मात्र ऐन थंडीतच निवडणूक रणधुमाळीचे वातावरण तापले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गावकीचे पुढारीपण आपल्याकडेच असावे या हट्टापोटी अनेक नवतरुणही निवडणूक रिंगणात सरसावले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनाकानंतरच निवडणुकीतील लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच गाव-कट्ट्यावरील चर्चांनी रंग भरायला सुरवात झाली असून निवडणूक खर्चाबाबतही आकडेमोड केली जात आहे.

निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या 

तालुका    ग्रामपंचायत संख्या
शिरूर    २०
माजलगाव    ३४
वडवणी    ६ 
पाटोदा    १६ 
आष्टी    ४ 
गेवराई    ३२ 
बीड    ९ 
अंबाजोगाई    १ 
परळी    निरंक
केज    २३ 
धारूर    १७
एकूण    १६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com