महाविद्यालयाच्या प्राचार्यास विद्यार्थिनींकडून चोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

बीड - बीड जिल्हा परिषदेच्या भाजपच्या सदस्यांचा पती आणि विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य असलेल्या राणा डोईफोडे विरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड - बीड जिल्हा परिषदेच्या भाजपच्या सदस्यांचा पती आणि विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य असलेल्या राणा डोईफोडे विरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राणा डोईफोडे हा आपल्याला अश्‍लील, द्वयार्थी बोलतो, हात पकडतो, सोबत फिरायला चल म्हणतो अशा तक्रारी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 26) सकाळी संबंधित महाविद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राणा डोईफोडे याला चोप दिला.

भाजपच्या पाली गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सारिका डोईफोडे यांचा पती असलेला राणा डोईफोडे हा विठाई नर्सिंग महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. त्याने शुक्रवारी एका विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्यानंतर विद्यार्थिनी व तिच्या नातेवाइकांनी राणा डोईफोडेला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

या प्रकरणात 10 ते 15 विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी फक्त एकच तक्रार द्या, इतरांनी साक्षीदार व्हा, अशी भूमिका घेतली. पोलिस ठाण्यातही विद्यार्थिनींवर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात येत होता. बहुतांश विद्यार्थिनी स्वतंत्र तक्रारीची मागणी करत असतानाही उशिरापर्यंत पोलिस एकच तक्रार घेण्याच्या भूमिकेत होते.