विवाहित प्रेमी युगुलाची विष पिऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

बीड - मागील बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी केसापुरी परभणी (ता. बीड) येथे उघडकीस आली. नारायण बाबूराव कवचट (वय 38, रा. केसापुरी परभणी) व सविता अनिल कदम (35, रा. पाटेगाव, ता. बीड) अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही विवाहित आहेत.

नारायण व सविता हे दोघे बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाइकांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी नारायण व सविता यांनी शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना विष प्राशन केल्याचे पाहून तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र, मंगळवारी सकाळी दोघांचाही अर्ध्या तासांच्या अंतराने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रेमप्रकरणातून आत्महत्येची मागच्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे.