बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

टालेवाडी येथील कुंदन वानखेडे हा शेतीचा व्यवसाय करतो. त्याचा श्रृंगारवाडी येथील मुली सोबत विवाह झाला होता, त्यांना बलभीम हा अडीच वर्षे व वैष्णव हा साडेचार वर्षे वयाची दोन मुले होती.

माजलगाव - तालुक्यातील टालेवाडी येथील कुंदन सुधाकर वानखेडे (वय 42) याने त्याची बलभीम (अडीच वर्ष) व वैष्णव (साडेचार वर्ष) या दोन चिमुरड्या मुलांना जाळून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता 21) रात्री घडली.

या बाबत माहिती अशी, की तालुक्यातील टालेवाडी येथील कुंदन वानखेडे हा शेतीचा व्यवसाय करतो. त्याचा श्रृंगारवाडी येथील मुली सोबत विवाह झाला होता, त्यांना बलभीम हा अडीच वर्षे व वैष्णव हा साडेचार वर्षे वयाची दोन मुले होती. मागील सहा महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद होत होता. पत्नी रेखा माहेरी येथे निघून गेली होती. बुधवारी रात्री कुंदन याने त्याच्या या चिमुरड्या मुलांना जाळून टाकून घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, कुंदनचा शोध घेण्यात येत आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​
जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा