जगदीश बेदरे प्रकरणात स्वत: लक्ष घालणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

बीड - पत्रकार जगदीश बेदरे आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपी दादा घोडकेला अटक आणि या प्रकरणात फसवणुकीचे कलम लावण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, या प्रकरणाची गेवराई पोलिसांकडून माहिती घेऊन सूचना देणार असल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पत्रकारांना दिले. 

बीड - पत्रकार जगदीश बेदरे आत्महत्या प्रकरणातील फरारी आरोपी दादा घोडकेला अटक आणि या प्रकरणात फसवणुकीचे कलम लावण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालू, या प्रकरणाची गेवराई पोलिसांकडून माहिती घेऊन सूचना देणार असल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पत्रकारांना दिले. 

‘सकाळ’चे गेवराई येथील बातमीदार जगदीश बेदरे यांनी बुधवारी (ता. २०) भूमाफियांकडून झालेल्या फसवणुकीमुळे आत्महत्या केली. या प्रकरणी भाजपचे दादा घोडके आणि कृष्णा मुळे या दोघांवर गुन्हे नोंद केले. यातील कृष्णा मुळेला अटक झाली असून दादा घोडके अद्यापही फरारी आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शी उघड आहे. तरीही गेवराई पोलिसांकडून आरोपींवर फसवणुकीचे कलम वाढविले जात नाही. त्याचबरोबर सहा दिवस लोटले तरी दादा घोडकेला गेवराई पोलिसांनी अटक केली नाही. या दोन कारणांनी गेवराई पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे दादा घोडकेची अटक आणि फसवणुकीचे कलम वाढवावे या मागणीसाठी पत्रकारांनी सोमवारी (ता. २५) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

या वेळी श्रीधर म्हणाले, या प्रकरणाची गेवराई पोलिसांकडून माहिती घेऊ, दादा घोडकेला तत्काळ अटक करण्याच्या सूचना देऊ. तसेच, या प्रकरणात फसवणुकीचे कलम वाढविण्याबाबतही योग्य कारवाई केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी विजय बहादुरे, संजय मालाणी, भास्कर चोपडे, अविनाश वाघिरकर, अनिल भंडारी, संदीप लवांडे, शिरीष शिंदे, सोमनाथ खताळ, मुकेश झणझणे, अभिजित नखाते, दिनेश लिंबेकर, अशोक खाडे, गोरख चिंचोलकर, अमोल मुळे, संजय तिपाले, व्यंकटेश वैष्णव, चंदन पठाण, उत्तम ओव्हाळ, दत्ता देशमुख, सुहास पवळ, अरविंद रेड्डी, प्रमोद ठोसर, विकास माने, अमित सासवडे, रवींद्र पालीमकर, गोविंद मस्के, सदाशिव नाईक यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.

Web Title: beed news Journalist Jagdish Bedara commits suicide