माजलगाव धरणामध्ये 48 टक्के उपयुक्त पाणीसाठा

कमलेश जाब्रस
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

धरणामधील सद्यपरिस्थिती 
धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा - 48 टक्के
धरणाची पाणीपातळी - 429.80 मिटर
एकुण पाउस - 554 मिली मिटर

माजलगाव : माजलगांव धरण कार्यक्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत दररोज वाढ होत आहे. आज ता. 14 गुरूवारी धरणाच्या पाणीपातळी 48 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

हवामान खात्याने यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाउस होईल असा अंदाज वर्तविला होता. परंतु खरिप हंगामाच्या सुरूवातीला जुन महिण्यात एकदा पाउस झाला होता परंतु नंतर पाउस गायब झाला व जुन, जुलै असे दोन महिने कोरडे गेल्याने धरणात 10 टक्केच उपयुक्त पाणीसाठा होता.

आॅगस्ट महिना अखेर सुरू झालेल्या पावसामुळे धरणात सध्या 48 टक्के पाणीसाठा उपयुक्त झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चा-याचा प्रश्न सुटणार आहे. उस, कापुस, तुर या पिकांना दिलासा मिळणार आहे. 

धरणामधील सद्यपरिस्थिती 
धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा - 48 टक्के
धरणाची पाणीपातळी - 429.80 मिटर
एकुण पाउस - 554 मिली मिटर