दोन मुलांना जाळून मारणाऱ्या निर्दयी बापास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पती - पत्नीमध्ये वाद सुरू होता. पत्नीने मुलांचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून न्यालयात दावा दाखल केला होता.

माजलगाव : बीड जिल्ह्यातील टालेवाडी (ता. माजलगाव) येथे स्वत:च्या दोन मुलांना जाळून मारणारा निर्दयी बाप कुंदन सुधाकर वानखेडे याला आज सकाळी पोलिसांनी अटक केली. कुंदन याने २१ जून रोजी रात्री हे अमानूष कृत्य केल्याचे उघड झाले होते. 

कुंदनने त्याची दोन मुले बलभीम व वैष्णव यांना राहत्या घरी जाळून मारल्याची घटना घडली होती, यानंतर आरोपी फरारी झाला आज टालेवाडी येथे आला असल्याची माहिती मिळाल्या वरून दिंदृड पोलिसांनी आज सकाळी दहा वाजता अटक केली आहे.
पती - पत्नीमध्ये वाद सुरू होता. पत्नीने मुलांचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून न्यालयात दावा दाखल केला होता.

टॅग्स