जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके लाच घेताना अटक
एक लाख १५ हजारांची लाच घेताना कारवाई
बीड : जिल्हा स्वस्तधान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून एक लाख १५ रुपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके व कारकून बब्रुवान फड या दोघांना आज (गुरुवार) सकाळी अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शासकीय विश्रामगृहाजवळ ही कारवाई केली.

एका स्वस्त धान्य दुकानादाराला दुकान निलंबनाची नोटीस जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांनी बजावली होती. ही कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, संबंधीत स्वस्त धान्य दुकानदाराने हा प्रकार संघटनेच्या कानावर घातला. संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मध्यस्थी करुन लाच देण्याचे ठरले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पडताळणी केल्यानंतर लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी लाच देण्याचे ठरल्यानुसार याच विभागातील कारकुर बब्रुवान फड लाच स्विकारत असताना एक लाख १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लुचपत प्रतिबंधक खात्याने त्यास रंगेहाथ पकडले.
औरंगाबदच्या प्रकरणात सक्तीची सेवानिवृत्ती
दरम्यान, डॉ. नरहरी शेळके औरंगाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी असताना त्यांच्या विरोधात गैरप्रकाराच्या आणि अनियमिततेच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्यावर ठेवलेले दोषारोप चौकशी समितीसमोर सिद्ध झाले आहेत. त्याचा अहवाल शासनाला सादर झाल्यावरुन डॉ. नरहरी शेळके यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ता. १९ मार्चला शासनाचे सहसचिव मा. आ. गुट्टे यांनी याबाबत आदेश काढले असून म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.