‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

बीड - बीडकरांना एकाच छताखाली सर्व आवश्‍यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने येथील सिद्धिविनायक संकुल भागात सुरू केलेल्या ‘सकाळ’ शॉपिंग महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. एक) सायंकाळी मोठ्या थाटात झाले. रविवारपर्यंत (ता. सहा) हा खरेदी महोत्सव चालणार आहे. 

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. सोलार दुकानाचे उद्‌घाटन पोलिस उपाधीक्षक (गृह) सुरेश चाटे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक सतीश जाधव, जमादार सुदर्शन सारणीकर, जमादार श्री. सोनवणे, धवल मेहता उपस्थित होते. येथील सिद्धिविनायक संकुलात हे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवले असून सहा ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत विक्रीसाठीही खुले असणार आहे. 

यामध्ये विविध गृहपयोगी वस्तूंसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सौंदर्य प्रसाधने, सजावटीचे साहित्य आदी विविध नामांकित कंपन्यांच्या वस्तूंची आकर्षक डिस्काउंटमध्ये विक्री होणार आहे. 

एकाच छताखाली सर्व आवश्‍यक वस्तू मिळणार असल्याने बीडकरांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. बीडकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.