'स्वच्छ भारत'चे पथकच निघाले लाचखोर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्पर्धेत येथील महापालिका सहभागी आहे. दोन हजार गुणांच्या स्पर्धेतील स्वच्छतेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 20) केंद्रीय पथक दाखल झाले.

औरंगाबाद - स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेविषयक पाहणी करण्यासाठी आलेले व तिघांचा समावेश असलेले केंद्रीय पथक लाचखोर निघाले. स्वच्छतेसंदर्भात चांगला अहवाल देण्यासाठी अडीच लाख मागणाऱ्या, तडजोडीनंतर एक लाख सत्तर हजार रुपयांवर समाधान मानून, ते स्वीकारताना तिघेजण पकडले गेले. येथील पंचतारांकित हॉटेलात शनिवारी (ता. 21) रात्री पावणेअकराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्पर्धेत येथील महापालिका सहभागी आहे. दोन हजार गुणांच्या स्पर्धेतील स्वच्छतेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 20) केंद्रीय पथक दाखल झाले. "क्‍वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया'च्या या पथकाचे शैलेंद्र बंजानिया हे प्रमुख असून, त्यांच्यासोबत कनिष्ठ सहायक विजय जोशी, गोविंद गिरामे यांचा समावेश आहे. चांगली बडदास्त व्हावी यासाठी महापालिकेने येथील अजंता अम्बॅसिडर या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. पथकाने काल सकाळी दहापासून शहरात पाहणीला सुरवात केली.

शैलेंद्र बंजानिया यांनी पहिल्या दिवशी महापालिकेतील स्वच्छ भारत नागरी अभियानाच्या समन्वयक डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याकडील 900 गुणांच्या प्रश्‍नावलीसह डाटाची पाहणी केली. पथकाने केलेल्या स्वच्छताविषयक सर्वेक्षणाचा केंद्र सरकारकडे चांगला अहवाल देण्यासाठी श्री. बंजानिया यांनी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. डॉ. कुलकर्णी यांनी तडजोड केल्यानंतर एक लाख 70 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात डॉ. कुलकर्णी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात फर्याद दिली. ठरल्यानुसार "अजंता अम्बॅसिडर'मध्ये रात्री पावणेअकराच्या सुमारास डॉ. कुलकर्णी यांच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना बंजानिया पकडले गेले. या वेळी हॉटेलमध्ये पथकातील अन्य दोघेही होते. एकूण तिघांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्‍त विवेक सराफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा

सर्वजण आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील रहीवासी नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर मोटारीने ट्रकला समोरून जोरदार धडक दिली...

01.57 PM

कोर्स नसलेल्या महाविद्यालयात अनेकांची प्रवेशासाठी निवड उमरगा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या पदव्युत्तर...

01.24 PM

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसह एक नगरपंचायत पाणंदमुक्‍त उस्मानाबाद - जिल्ह्यातील शहरांची वाटचाल क्लीन सिटीच्या दिशेने सुरु आहे....

01.24 PM