उर्दू घर चोरी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
रविवार, 27 मे 2018

देगलूर नाका भागात शासकिय उर्दू घर आहे. लाखो रुपये खर्च करून उर्दू घराची सुशोभीत ईमारत उभी करण्यात आली. परंतु या ईमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तींनी या उर्दु घराला २३ जानेवारी २०१८ ला आग लावून आतमधील जवळपास आठ लाखाचे किंमती सामान लंपास केले होते.

नांदेड - येथील देगलूर नाका भागातील मदिना तुल- उलूम हायस्कुलच्या बाजूला असलेल्या उर्दू घराला आग लावून अज्ञातांनी जवळपास आठ लाखाचे किंमती सामान लंपास केले होते. या प्रकरणी अखेर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून इतवारा ठाण्यात शनिवारी (ता. २६) रात्री एकच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देगलूर नाका भागात शासकिय उर्दू घर आहे. लाखो रुपये खर्च करून उर्दू घराची सुशोभीत ईमारत उभी करण्यात आली. परंतु या ईमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तींनी या उर्दु घराला २३ जानेवारी २०१८ ला आग लावून आतमधील जवळपास आठ लाखाचे किंमती सामान लंपास केले होते. तर जवळपास सत्तर हजाराचे तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणाची दखल महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतली. एक समिती गठीत करून मिळालेल्या अहवालावरून तहसिलदार किरण अंबेकर यांच्या फिर्यादीवरुन इतवारा ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पठाण हे करित आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: In the case of Urdu house theft filed a complaint