तुळजापुरातील नगराध्यक्षासह "सीईओ'विरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

तुळजापूर - शारदीय नवरात्रोत्सवासाठी प्राप्त यात्रा अनुदानातून एक कोटी 62 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व कंत्राटदाराविरोधात मंगळवारी (ता. 28) गुन्हा नोंद झाला. संबंधितांनी बनावट शिक्के, लेटरहेड व स्वाक्षऱ्या करून ही रक्कम हडप केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

तुळजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजाभवानी नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारकडून पालिकेला दरवर्षी दीड कोटी रुपयांचे यात्रा अनुदान मिळते. 2012 मध्ये मिळालेल्या अनुदानात अपहार झाल्याची फिर्याद राजाभाऊ दिगंबर माने यांनी दिली आहे. नगराध्यक्षा अर्चना गंगणे, तत्कालीन मुख्याधिकारी टेंगळे, लेखापाल अविनाश राऊत यांनी संगनमत करून या रकमेचा अपहार करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे नमूद आहे. तसेच, पाच महिला बचतगटांची बनावट निर्मिती करून बनावट लेटरहेड तयार केले. त्यावर एकाच व्यक्तीने मजकूर लिहिला असून, बनावट शिक्के तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्या करीत, खोट्या निविदा खरेदी केल्याचे दाखविले. तसेच दरपत्रक भरून बनावट निविदा पॉकिटे तयार करून मर्जीतील ठेकेदारांना ठेका दिल्याचे दाखविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

Web Title: CEO against crime

टॅग्स