नारायणदेव बाबा यांचे औरंगाबादेत निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

चिंचोली लिंबाजी (जि. औरंगाबाद) - श्री शिवेश्‍वर क्षेत्र वाकी (ता. कन्नड) येथील नारायण अश्रुबा पल्हाळ ऊर्फ शिवस्वरूप नारायणदेव बाबा (वय 90) यांचे सोमवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

महिनाभरापासून नारायण बाबांवर उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची तब्येत चिंताजनक होती. त्यांच्या मागे पत्नी जनाबाई, मोठा मुलगा उत्तराधिकारी नामदेव महाराज यांच्यासह तीन मुलगे व तीन मुली असा परिवार आहे. नारायणदेव बाबा यांचा महाराष्ट्रात मोठा भक्तपरिवार आहे. बालवयातच बाबांनी गौताळा अभयारण्याच्या कुशीत धारकुंड धारेश्‍वर येथे शिवेश्‍वर देवस्थानाची स्थापना केली. पंढरपूर, आळंदी व पैठण येथे भक्त निवास उभारले.