औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद यांच्या नियुक्ती 

मनोज साखरे 
सोमवार, 28 मे 2018

गत महिन्यापासून चिरंजीव प्रसाद यांनीही औरंगाबादेत वर्णी लागावी म्हणून हालचाली सुरू केल्या होत्या. यात त्यांना यश आल्याचे पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

औरंगाबाद - गत अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या औरंगाबादेतील पोलिस आयुक्तपदी नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियूक्ती करण्यात आली. याबाबत आदेशही प्राप्त झाले असून त्यांच्या नावाची गत एक महिण्यांपासून चर्चा होती. अखेर ही बाब खरी ठरली. 

मिटमिट्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना महिनाभरासाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते; मात्र रजा संपली तरीही ते रुजू झाले नाहीत. दरम्यान, त्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही बदली झाली नाही; परंतु आता शहर पोलिस आयुक्त म्हणून चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. गत महिन्यापासून चिरंजीव प्रसाद यांनीही औरंगाबादेत वर्णी लागावी म्हणून हालचाली सुरू केल्या होत्या. यात त्यांना यश आल्याचे पोलिस दलातील उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

असा आहे कार्यकाळ -
- 1996 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले चिरंजीव प्रसाद 2002 ते 2005 मध्ये औरंगाबाद व जालन्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. 
- 26-11च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते त्यात चिरंजीव प्रसाद यांची महत्त्वाची भूमिका होती. 
- 2011 मध्ये नागपूरचे डीआयजी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर सीआरपीएफमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. छत्तीसगड आणि बिहारमधील नक्षलग्रस्त भागातही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. 
- 2015 पासून नांदेड विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Chiranjeev Prasad appointed as the Aurangabad Commissioner of Police