मनोरूग्ण मुलीस मिळाला नागरिकांचा मदतीचा हात

mantha
mantha

मंठा (जालना) : सामाजिक बांधिलकी म्हणून मंठा शहरात दिवसभर फिरत असलेल्या व रात्री बसस्थानक किंवा अंधाराचा सहरा घेणाऱ्या पंधरा-सोळा वर्षाच्या मनोरुग्ण मुलीस बाजार समितीचे संचालक कैलास बोराडे व नागरीकांनी पोलीसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेऊन जिल्हा सुधारगृहात पाठविले आहे.

मनोरुग्ण व्यक्ती घरात सांभाळणे खूप अवघड काम आहे. घरच्यांना लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमात सहभागी होण्यास अडचणी येतात. त्यात मनोरुग्ण महिला असेल व घरची परिस्थिती ठिक नसेल तर अशा मनोरुग्णांना सांभाळणे कठीण असुन हे मनोरुग्ण गावात दिवसभर फिरत राहतात. गावातील नागरिकांना त्रास होत असेल तर गावकरी असे मनोरुग्ण इतरत्र दुरच्या अनोळखी गावात नेऊन सोडतात. अशीच एक पंधरा सोळा वर्षाची मनोरुग्ण मुलगी मंठा शहरात दिवसभर फिरत होती. कोणी काही खायला दिले तर ते खाऊन रात्रीच्या वेळी बसस्थानक किंवा अंधाराचा सहरा घेऊन अडचणीच्या ठिकाणी थांबत होती. तिला गावात फिरताना लहान मुले दगड मारुन त्रास देत होते. 

तिची असाहाय्य परिस्थिती पाहून बाजार समितीचेसंचालक कैलास बोराडे, बाजीराव बोराडे, गजानन झोल, पंकज नांगरे, ताहेर बागवान, आकाश कास्तोडे, राज जाधव, आनंद कुलकर्णी, कुलदीप बोराडे आदींनी तिला पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभवन यांना संपर्क करून पोलिस ठाण्यात आणले. 

या मनोरुग्ण भेदरलेल्या मुलीला महीला पोलिस सविता फुलमाळी यांनी स्वच्छ आंघोळ घालून जेवण दिले. या मुलीस नागरीक व पोलीसा बद्दल विश्वास वाटल्या नंतर तिने स्वतः बद्दल माहिती दिली. तिचे नाव जयश्री श्रीरंग पाथ्रीकर असुन राहणार वैरागड जिल्हा गडचिरोली असुन तिचे शिक्षण सातवी पर्यंत झाले आहे. घरची अत्यंत गरीबीची परिस्थिती असुन वडील वारले आहे. तर आई मोलमजुरी करते. इतर नातेवाईक गरीब असल्याने ते देखील विचारीत नाही. अशी तिने माहिती दिली. 

याबाबत पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभवन व पोलिस काॅन्सटेबल गणेश गायकवाड यांनी अरमोड जि.  गडचिरोली येथील पोलिस ठाण्यात व पोलिस पाटील यांना संपर्क करून माहिती घेतली असुन तिने सांगितलेली माहिती खरी आहे. रविवारी (ता. 15) पोलीसांनी या मनोरुग्ण मुलीस जालना येथील सुधारगृहात पाठविले आहे. 

या मुलीस कैलास बोराडे यांनी स्वतःच्या वाहने पाठवीले असुन मंठा येथून जाताना तिला आनंदाश्रू आवरत नव्हते. सर्वांना हात हालवून तिने निरोप दिला. या सामाजिक उपक्रम बद्दल सहकार्य करणार्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com