स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात जालना रोडवर शहर बससेवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - स्मार्ट सिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात 90 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, मात्र अजून हा निधी प्राप्त झाला नाही. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अन्य प्रमुख मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय एसपीव्हीच्या बैठकीत होईल असे महापालिका आयुक्‍त तथा एसपीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण शहरासाठी असलेल्या पॅनसिटी मॉडलअंतर्गत सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. शहर बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने शहर बससेवा मार्गांचे, बसस्थानकांचे सर्वेक्षण करण्याचे काम आयटीडीपी करीत आहे. 

बुधवारी (ता. एक) आयटीडीपी, एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय व महापालिकेच्या वतीने जालना रोडवर सर्वेक्षण करण्यात आले. या संदर्भात गुरुवारी (ता.दोन) पत्रकारांशी बोलताना श्री. बकोरिया म्हणाले, जालना रोडवर सर्वेक्षण झाले आहे, त्याचा अहवाल येईल. दरम्यान पुन्हा एकदा सर्वेक्षण करणार आहोत. एसपीव्हीच्या माध्यमातून सुरवातीला काही ठराविक मार्गांवर शहर बससेवा सुरू करणे शक्‍य आहे. हे मार्ग कोणते असतील याचा निर्णय एसपीव्हीच्या बैठकीत घेतला जाईल. स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा परदेश दौऱ्यावर असून ते येत्या दोन- तीन दिवसांनंतर येणार आहेत. ते आल्यानंतर एसपीव्हीच्या बैठकीची तारीख ठरणार आहे. तथापि जालना रोड हा अतिशय वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर प्राधान्याने शहर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात दुमजली बसची गरज नाही. चांगल्या दर्जाच्या बस आणि अधिकच्या फेऱ्या वाढविल्या तरी ते शहर वाहतुकीच्यादृष्टीने पुरेसे राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. 

मराठवाडा

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

03.51 PM

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

03.24 PM

जालना : मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने रविवारी (ता.20) जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये...

03.18 PM