शहरातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

औरंगाबाद : दुसरा शनिवार, रविवार आणि त्याला लागून आलेली स्वातंत्र्यदिनाची सुटी म्हणजे मुसाफिरांसाठी पर्वणी ठरली आहे. सलग तीन दिवस सुट्या आल्याने शहरातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत.

औरंगाबाद : दुसरा शनिवार, रविवार आणि त्याला लागून आलेली स्वातंत्र्यदिनाची सुटी म्हणजे मुसाफिरांसाठी पर्वणी ठरली आहे. सलग तीन दिवस सुट्या आल्याने शहरातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत.

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील पाणचक्की, मकबरा या पर्यटनस्थळांच्या तिकीट विक्री खिडकीवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसरा शनिवार, रविवार आणि त्याला लागून आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची शहरात झुंबड उडाली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक औरंगाबादेत आले आहेत. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ आणि अजिंठा या जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटनस्थळांमध्येही रविवारी (ता.14) सायंकाळी उशिरापर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होती.
 
मकबऱ्यात पार्किंगही गच्च!
बिबी का मकबरा येथील पार्किंग रविवारी (ता.14) ओव्हर फ्लो झाली होती. सुमारे अडीच एकरमधील विस्तीर्ण पार्किंग गाड्यांनी गच्च भरलेली होती. अखेर मकबऱ्याकडून लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांनी गाड्या लावल्या.

फोटो गॅलरी