शासकीय रुग्णालयात  लहान शस्त्रक्रिया बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

लातूर - राज्यात डॉक्‍टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व शासनाने डॉक्‍टरांच्या संरक्षण कायद्याची कडक अंमबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर सामुदायिक रजेवर गेले आहेत. त्याचा परिणाम शासकीय रुग्णालयावर झाला आहे. रुग्णसेवा विस्कळित झाली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार केंद्रात लहान शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रजेवर गेलेल्या निवासी डॉक्‍टरांना कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

सर्वोपचार केंद्रातील 82 निवासी डॉक्‍टर रजेवर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळित झाली आहे. त्यात आता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे; पण यात लहानलहान शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया मात्र केल्या जात आहेत. दरम्यान या सर्व डॉक्‍टरांना कारवाईच्या नोटिसा अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी दिल्या आहेत. त्या डॉक्‍टरांनी न घेतल्याने ते ज्या ठिकाणी राहतात, तेथे त्यांच्या घरांच्या दरवाजाला त्या डकविण्यात आल्या आहेत. याकरिता पोलिस बंदोबस्तात एका क्‍लार्कने हे काम केले आहे. काही रुग्ण आता खासगी रुग्णालयात जात आहेत. दरम्यान, बुधवारी अशोक गायकवाड या विष घेतलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. उपचार न केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला; पण विष मोठ्या प्रमाणात घेतल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉ. शिंदे म्हणाले. 

""सामुदायिक रजेवर 82 डॉक्‍टर गेले आहेत. त्यानंतर वरिष्ठ डॉक्‍टर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक रुग्णांची तपासणी करीत आहेत. सेवा विस्कळित होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. या ड़ॉक्‍टरांना कारवाईची नोटीस देण्यात आली आहे.'' 
डॉ. अशोक शिंदे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. 

""आम्हाला संरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे. आमचा संप नाही तर आम्ही सामुदायिक रजेवर आहोत. निवासी डॉक्‍टर हे विद्यार्थी असून विद्यावेतनावर काम करतात. शासकीय रुग्णालयात शासनाने सुविधा पुरवणे गरजेचे आहे. त्या नसल्याने रुग्णाचे नातेवाईक डॉक्‍टरांवर राग व्यक्त करीत आहेत. मारहाण करून प्रश्न सुटणार नाहीत. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.'' 
डॉ. जगदीश बनसोडे, डॉ. सुनील बोबडे, निवासी डॉक्‍टर. 

Web Title: civil hospital small surgery Off