गॅस एजन्सींच्या झाडाझडतीत हाती लागल्या किरकोळ तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

औरंगाबाद - जिल्ह्यातील सर्व ४२ गॅस एजन्सींच्या झाडाझडतीमध्ये प्रशासनाला किरकोळ तक्रारी वगळता काहीच आढळून आलेले नाही. महिन्याभरापूर्वी झालेल्या तपासणीचा केवळ १९ एजन्सींचा अहवाल प्रशासनापर्यंत पोचला असून, अद्यापही २३ एजन्सींचा तपासणी अहवाल गुलदस्त्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील गॅस एजन्सींमार्फत पाच लाख ४६ हजार ६५७ ग्राहकांना सिलिंडर देण्यात येतात.

शहरासह जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून गॅस सबसिडी, वितरण, गॅस सिलिंडर वेळेत न मिळणे, सिलिंडरमधून लिकेज, सिलिंडरचे वजन कमी, घरपोच गॅस देताना मागण्यात येणारी अधिकची रक्कम अशा ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. मात्र या तपासणी मोहिमेत प्रशासनाला हाती काहीच लागले नाही.

जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या एकूण ४२ गॅस एजन्सी असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांकडून गोडाऊनमधील गॅस सिलिंडरचा साठा, ग्राहकांच्या तक्रारी, कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण लेखाजोखा तपासण्यात आला. पथकांना काही ठिकाणी स्टॉकसंदर्भात नोंदीमध्ये तसेच कागदपत्रांमध्ये तफावत आढळली. याच तफवतींची काही पथकाने नोंद केली. या शिवाय सर्वकाही आलबेल असल्याचा अहवाल तयार करण्यात आला. मात्र २३ एजन्सींचा अहवाल अद्याप पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला नाही.

मराठवाडा

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

07.00 PM

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM