लातूर: आता राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ नाही!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

लातूर : 'बुडते को तिनके का सहारा ही बहुत' असे म्हटले जाते, पण सध्या पराभवामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला आगामी महापालिका निवडणुकीत साथ न देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाला खिंडार पडतेय तर दुसरीकडे ज्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिले त्यांनी देखील पाठ फिरवल्याने लातूरमध्ये काँग्रेस समोरील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. 

महापालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करुन सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची जेमतेम ताकद असली तरी शहरात त्यांचे उपद्रव मूल्य अधिक आहे. त्यामुळे भाजप वरचढ ठरत असताना काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ महत्त्वाची ठरणार होती. पण बुडत्या जहाजात न थांबण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्याचे कळते. मागील निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच मुख्य लढत होऊन काँग्रेसला 48 तर, राष्ट्रवादीला 13 जागा मिळाल्या होत्या. दहा ते बारा वॉर्डात राष्ट्रवादीचे उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते.

काँग्रेसशी आघाडी केल्यास पक्षाचे नुकसान होईल असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला, त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करण्याचा राष्ट्रवादीचा विचार नसल्याचे सावे यांनी जाहीर करून टाकले.

मराठवाडा

पोटाची खळगी भरण्यासाठी लाखो कुटुंबांची शहरांकडे धाव औरंगाबाद - खरीप...

05.51 AM

उस्मानाबाद - गरिबीला कंटाळून बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील देवकन्या रमेश तानवडे (...

05.15 AM

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017