विद्यार्थ्यांना विषबाधाप्रकरणी ठेकेदारासह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

लातूर - सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील 212 विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधाप्रकरणी ठेकेदारासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

लातूर - सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील 212 विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधाप्रकरणी ठेकेदारासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागातर्फे अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथील नवीन एमआयडीसीत उभारलेले एक हजार क्षमतेचे वसतिगृह आहे. रविवारी (ता. 4) दुपारी विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर काहींना उलट्या-मळमळ, चक्करचा त्रास जाणवू लागला. मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत 212 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांवर सोडून देण्यात आले. तीन मुली व चार मुलांवर आज उपचार सुरू होते. वसतिगृहातील अजय कांबळे (रा. लोणी, ता. उदगीर) या विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात ठेकेदार गोविंद जाधव, विठ्ठल देशमुख, स्वयंपाकी भीमराव कांबळे, मदतनीस अजय शिंदे यांना पोलिसांनी अटक केली.

अन्नाचे नमुने प्रयोगशाळेकडे
अन्नातून विषबाधा झाली का, हे पाहण्यासाठी पोलिस व सामाजिक न्याय विभागातर्फे अन्न व औषधी प्रशासनाला पत्र देण्यात आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवालानंतर नेमका प्रकार कळणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाडा

जालना : मागील महिनाभरापासून गायब असलेल्या पावसाने रविवारी (ता.20) जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये...

03.18 PM

जरंडी : अजिंठा डोंगर रांगांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोयगाव वनक्षेत्रातील चिंचखोरी शिवारातील डोंगररांगांच्या...

02.33 PM

गेवराई : शनिवारी झालेल्या पावसाने नदीपात्रातील विद्युत मोटार काढण्यासाठी गेलेला एक शेतकरी गोदावरीत आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून...

01.33 PM