यात्रा अनुदान अपहार, आणखी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

तुळजापूर - येथील यात्रा अनुदान अपहारप्रकरणी अटक केलेल्या नगरपालिकेतील बचतगट विभागाच्या कर्मचाऱ्याला मंगळवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 13) दिला. 

नगरपालिकेच्या यात्रा अनुदानातून 1 कोटी 62 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल यांच्यासह तत्कालीन नगरसेवक, ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगरपालिकेचा बचतगट सांभाळणारा जयराम माने याला बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात माने यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असून, त्यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली. यापूर्वी ठेकेदार शशिकांत जाधव, बापू पारडे, पारजी देवकर यांना अटक केली असून, जयराम माने हा चौथा आरोपी आहे.

Web Title: crime in tuljapur