त्रास सोसणारे स्वातंत्र्यसैनिक - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

उस्मानाबाद - सध्या देशात आर्थिक स्वातंत्र्याची लढाई सुरू असून, पन्नास दिवस त्रास सहन करेल तो स्वातंत्र्यसेनानी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले. राज्यात 2019 पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

उस्मानाबाद पालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. 23) झालेल्या सभेत ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की धनदांडग्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा दडवून ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. या निर्णयाचा जनतेला त्रास होत आहे. पण ही आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे. या लढाईत 50 दिवस त्रास सहन करणारा स्वातंत्र्यसेनानी असणार आहे, हे लक्षात घ्या. विरोधकांनी सत्तेतून पैसा अन्‌ पैशातून सत्ता मिळविण्याचा व्यवसाय केला, अशी टीका करून, देशात 2022 पर्यंत सर्वांना घरे दिली जाणार आहेत, महाराष्ट्रात मात्र 2019 पर्यंत सर्वांना घर दिले जाईल, असे ते म्हणाले.