'मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता बदल घडवावा '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

परळी वैजनाथ - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा परळी तालुक्‍यातील जनतेने भावनेच्या आहारी न जाता बदल घडविण्याचे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

परळी वैजनाथ - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा परळी तालुक्‍यातील जनतेने भावनेच्या आहारी न जाता बदल घडविण्याचे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता.6) येथील हालगे गार्डन सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. मुंडे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद फड यांच्यासह बन्सीअण्णा सिरसाट, बाबूराव मुंडे, संजय दौंड, वसंत मुंडे, प्रा. मधुकर आघाव, सूर्यकांत मुंडे, किसनराव बावणे, श्री. नायबळ, अजय मुंडे, प्रा. विजय मुंडे, माणिक फड, राजेश्‍वर चव्हाण, रेश्‍मा गित्ते, मारोती मुंडे, चंद्रकांत गायकवाड, बबन फड, अजित देशमुख, भानुदास डिघोळे, रामराव गित्ते, प्रा. पटेल, बाजीराव गित्ते, वसंतराव लाखे, ईश्‍वर शिंदे, धर्मराज पाटील, शेषेराव हाके, रामलिंग चव्हाण, मोहन सोळंके, अन्नपूर्णा जाधव, वैशाली तिडके, डॉ. संतोष मुंडे यांच्यासह उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते. 

धनंजय मुंडे म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे, नोटाबंदीने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. शेतीमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, या स्थितीला भाजपचे सरकार जबाबदार आहे.