अर्ज बाद होण्याचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

निलंगा - निलंगा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नगराध्यक्षपदासह 91 नगरसेवकांचे 97 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज बाद होण्याचा बहुदा हा नवा विक्रमच असावा. उमेदवारी अर्ज छाननीनंतर निवडणुक निर्णय अधिकारी भवानजी आगे-पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

निलंगा नगराध्यक्षपदासाठी 22 जणांनी 27 अर्ज दाखल केले होते. या अर्जांची उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात छाननी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदासाठीच्या 14 उमेदवारांचे 17 अर्ज अवैध झाले. तर नगरसेवकपदासाठी 180 उमेदवारांच्या 194 अर्जांपैकी छाननीत 77 उमेदवारांचे 80 अर्ज बाद ठरवण्यात आले. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विलास सूर्यवंशी यांनी त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकपदाचे उमेदवार ईस्माईल लदाफ यांच्यावर आक्षेप घेतला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज बाद होण्यामागे पक्षाचे ए, बी, फॉर्म न जोडणे हे एक कारण असल्याचे कळते. छाननीत नगराध्यक्षपदासाठी पहिल्या दिवशीच्या आठ उमेदवारांचे दहा तर नगरसेवकपदासाठी 106 उमेदवारांचे 114 अर्ज वैध ठरले आहेत.
 
मराठवाडा

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथील लोहिया मैदान परिसरात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला नाल्यात फेकून दिले...

08.15 PM

पाथरी : खाजगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतर ही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन...

02.03 PM

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक...

01.45 PM