भुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक

भुखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार दुधगावकर यांना पोलिसांकडून अटक

परभणी : भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी (ता.15) सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक केली.  येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील 135 कर्मचाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर 613 मध्ये 16 एकर 8 गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती.

त्यानंतर माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करून दिली. या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द ता. 16 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणातील तलाठी दत्तात्रय कदम यास शुक्रवारी (ता.12) रात्री अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. सोमवारी (ता.15) या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना त्यांच्या पोखर्णी येथील फार्म हाऊसमधून अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com