गणेश विसर्जन मिरवणुकीत तार तुटल्याने गणेश भक्तांचे प्राण धोक्यात

sonpeth
sonpeth

सोनपेठ - सोनपेठ शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ब्राह्मन गल्ली मधील विद्युत प्रवाह चालू असलेली तार तुटल्यामुळे विद्युत प्रवाह गणपतीच्या ट्रॅक्टरमध्ये उतरला होता. मात्र गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. 

शहरातील पारंपरिक गणेश मंडळांची आज विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू आहे. परंतु, जगदंबा प्रासादिक गणेश मंडळाची मिरवणूक ब्राह्मण गल्लीमध्ये येताच रस्त्यात लोम्बकळणारी विद्युत तार गणपतीच्या ट्रॅक्टरला अडकून अचानक तुटली व ट्रॅक्टरवर पडली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये अनेक छोटी मुले बसलेली होती. परंतु, त्यामधील संचित कुलकर्णी या मुलांने प्रसंगावधान दाखवल्याने सगळ्यांचे प्राण वाचले. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मंडळाचे कार्यकर्ते सतीश मुळी व परळकर यांनी फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला. 

या आधी प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग पाहिला होता. तसेच ब्राहमन गल्ली मधील विद्युत तारा संबंधी माहिती देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली होती. मात्र याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठा अपघात झाला, परंतु गणेश भक्तांच्या समयसूचकते मुळे मोठा अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com